मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

६३ वर्षीय वृद्धेच्या जागी ४३ वर्षीय महिला उभी राहून रजिस्ट्री

On: April 1, 2026 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

६३ वर्षीय वृद्धेच्या जागी ४३ वर्षीय महिला उभी राहून रजिस्ट्री

 

फसवणुकीचा गुन्हा : दस्त

 

नोंदविताना सहदुय्यम निबंधक डोळे बंद करून बसतात का?

 

छत्रपती संभाजीनगर: बनावट

 

आधार कार्ड सादर करून ६३ वर्षीय वृद्धेच्या जागी ४३ वर्षीय महिलेला उभा करून सिल्लोडमधील प्लॉटचे कुलमुखत्यारपत्र (जीपीए) केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ३० मार्च रोजी चौघांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अज्ञात महिला, पठाण वसीमखान युसुफखान, शाकीरखान जुम्मा खान पठाण आणि शेख गुफरान शेख युसुफ (चौघे रा. सिल्लोड), अशी आरोपींची नावे आहेत. प्रभारी सह दुय्यम निबंधक (क्र. १) रवींद्र युवराज तोंडे फिर्यादी आहेत. त्यांच्याकडे सुरेखा विलास चौधरी यांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानुसार, सिल्लोड येथील गट क्रमांक ९४/१ मधील प्लॉट नं. १०८

 

भूमाफियांचे कृत्य मूळ मालकिणीचे वय ६३ वर्षे आहे,

 

मात्र बनावट महिलेने स्वतःचे वय ४५ वर्षे असल्याचे भासवले. तसेच आधार क्रमांकही भलताच दिला. नोंदणीवेळी घेतलेला फोटो आणि प्रत्यक्ष तक्रारदार महिला यांच्यात मोठी तफावत आढळली. खऱ्या मालकिणीची ओळख पटल्याचे सांगून दोन साक्षीदारांनी संगनमताने सह्या केल्या. आता ती बोगस महिला कोण? तिचे बोगस आधारकार्ड या पोर्टलवर कसे स्वीकारले? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. हा सर्व खटाटोप भूमाफिया करतात, असे जाणकारांचे मत आहे.

 

हा त्यांच्या मालकीचा आहे. मात्र, पठाण वसीम खान याने सुरेखा चौधरी यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड आणि फोटो वापरून २६ डिसेंबर २०२५ रोजी बनावट कुल मुखत्यारपत्र नोंदवून घेतले होते. मूळ मालकीण सुरेखा विलास चौधरी यांनी तक्रार केली, तेव्हा निबंधकांनी पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

ईडीनं फास आवळला गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

अहिल्यानगरच्या बोधेगावमध्ये जुन्या वादातून दोन गटांत तीव्र संघर्ष; दोन जण गंभीर जखमी

शाळेत काम करणाऱ्या महिलेवर ग्रा.पं. लिपिकाचा दोनदा लैंगिक अत्याचार!; चिकलठाणा परिसरातील धक्कादायक घटना

Leave a Comment