मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

तहसीलदार ज्योती पवार का कमला गोदावरी नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा; प्रशासनावर सवाल

On: April 23, 2026 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

विशेष वार्ता | दैनिक शब्दमत

 

गोदावरी नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा; प्रशासनावर सवाल

 

पैठण (प्रतिनिधी) – पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिरडपुरी परिसरातील वाळू घाटावर दिवस-रात्र सुरू असलेल्या या अवैध कारभारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे 100 ते 200 हायवा व ट्रकद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वाहने विनानंबर किंवा नियमांचे उल्लंघन करत खुलेआम फिरताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

हिरडपुरी येथील शासकीय वाळू घाटावर रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विना रॉयल्टी वाळू वाहतूक होत असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे. काही स्थानिक अधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांना अभय दिले जात असल्याचीही कुजबुज गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.

 

या अवैध वाळू उपशामुळे नदी पात्र दिवसेंदिवस खोल होत असून भूजल पातळी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शेती, पूल आणि परिसरातील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

 

दरम्यान, संबंधित प्रकरणाची माहिती असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप तहसील प्रशासनावर होत आहे. तसेच विना नंबर धावणाऱ्या हायवा वाहनांवर पाचोड पोलीस ठाणे यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

“कारवाई कधी होणार?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment