मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जालना रोड ते सांगवी बायपास रस्त्याचे काम ठप्प; पावसाळ्यापूर्वी तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी

On: May 5, 2026 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना रोड ते सांगवी बायपास रस्त्याचे काम ठप्प; पावसाळ्यापूर्वी तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

आजमत पठाण यांची विशेष रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शहरातील जालना रोड ते सावंगी बायपास दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत थांबल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या सुमारे शंभर कोटींच्या निधीतून या मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यातील काही भाग पूर्ण करून उर्वरित काम ठेकेदाराने सोडून दिल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

विशेषतः हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगर परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसत असून, पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्ता पूर्ण न झाल्यास नागरिकांना चिखलातून ये-जा करावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून या मार्गावर काम सुरू होते, परंतु सध्या ते पूर्णपणे ठप्प झाले आहे.

 

महानगरपालिकेकडून सुमारे चार कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात काम अपूर्ण ठेवून ठेकेदाराने बिल उचलल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रारी देखील सादर केल्या आहेत.

 

दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांनी अनेक वर्षांपासून विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट आणि आरोग्य सेवांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

“पावसाळ्यापूर्वी जालना रोड ते सावंगी बायपास रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करून पूर्ण करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी दैनिक शब्दमतशी बोलताना व्यक्त केली. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन काम पुन्हा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment