मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अपहरण व खंडणी प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयातून जामीन

On: May 6, 2026 11:01 AM
Follow Us:
---Advertisement---

अपहरण व खंडणी प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयातून जामीन

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | दैनिक शब्दमत

 

अपहरण, मारहाण व खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी हा आदेश पारित केला.

 

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अंतर्गत आरोपी रमेश्वर उर्फ रमेश काळे याच्यावर अपहरण, मारहाण व खंडणीचे आरोप ठेवण्यात आले होते. तक्रारदाराचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली तसेच त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

 

घटनेचा तपशील

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार चिकलठाणा येथील शेतातून परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी डोळे बांधून त्यांना त्यांच्या स्वतःच्या कारमधून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे मारहाण करून पैशांची मागणी करण्यात आली. आरोपींनी तक्रारदाराकडील ८०० रुपयांची रोकड आणि सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराला बदनापूर तालुक्यातील किनगाव फाटा येथे सोडून देण्यात आले.

 

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रमेश्वर काळे यास जामीन मंजूर केला.

 

  1. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. डॉ. अनघा पेडगांवकर यांनी बाजू मांडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment