मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

On: May 25, 2026 3:20 PM
Follow Us:
---Advertisement---

जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका) : येत्या पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा विकास करावा. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी सज्जता ठेवावी, असे निर्देश विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम. जी. नांद्रे, सहायक पशु आयुक्त डॉ. आर. डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ-मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्यासाठी विविध जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

त्यामध्ये समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान बंधारे, नाला खोलीकरण तसेच विहिरींचे पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विविध विभागांमार्फत या उपाययोजना राबविल्या जात असून जलयुक्त शिवार अभियानातील कामांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

 

प्रत्येक पाणलोट क्षेत्रात पाणी अडवून त्या भागाचा विकास साधणे आवश्यक असल्याचे सांगत, “पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे,” असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. तसेच ‘जलसंचय जनभागीदारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment