मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

यावर्षी नालेसफाई झालीच नाही; पावसाच्या तोंडावर सभापतींना जाग, मनपा प्रशासनावर नागरिकांचा संताप

On: June 4, 2026 7:16 PM
Follow Us:
---Advertisement---

यावर्षी नालेसफाई झालीच नाही; पावसाच्या तोंडावर सभापतींना जाग, मनपा प्रशासनावर नागरिकांचा संताप

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेच्या नालेसफाई कामांचा संथ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. जाफर गेट, मोती कारंजा, औषधी भवन, संभाजीपेठ आणि समर्थनगर परिसरातील नालेसफाई कामांची पाहणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी केली असता अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे आढळून आले.

 

पाहणीदरम्यान नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नालेसफाईच्या कामांबाबत मनपा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वीही सभापती मकरिये यांनी वेळोवेळी या कामांची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही कामाचा वेग वाढलेला नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत कामे अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी केवळ औपचारिकता पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

 

पावसाळा तोंडावर असताना नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करून काढलेला गाळ तत्काळ उचलण्याचे निर्देश सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यंदा नालेसफाईकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

फोटो कॅप्शन : जाफर गेट, मोती कारंजा व इतर भागांतील नालेसफाई कामांची पाहणी करताना स्थायी समिती सभापती अ


  1. निल मकरिये.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment