मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

On: July 5, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ जुलै : शिवाजीनगर परिसरात हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला जवाहरनगर पोलिसांच्या बिट मार्शल पथकाने शिताफीने पकडले. आरोपीकडून सुमारे २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात एक युवक हातात कोयता घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना मिळाली. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, मपोह उपाध्ये, पोअं. मारोती गोरे तसेच डायल-११२ पथकातील पोह. वामन नागरे यांनी संयुक्त कारवाई केली.

 

रेल्वे पटरीलगतच्या भुयारी मार्गाजवळ संशयित युवक दिसताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे (वय १९, रा. इंदिरानगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

 

आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता आणि अंदाजे २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. मोबाईलबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने तोही जप्त करण्यात आला.

 

पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देगलूर करीत आहेत.

 

पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही मोबाईल हिसकावल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. अल्पवयीन असताना त्याच्यावर आणखी दोन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, मपोह उपाध्ये, पोह. वामन नागरे आणि बिट मार्शल पोअं. मारोती गोरे यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

सोयगाव : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; सोयगाव पोलिसांची कारवाई, माळेगाव पिंपरी बेकायदा वाळू उपसा

प्रभाकर (आबा) काळे यांच्या विजयानिमित्त सोयगावात जल्लोष; सत्कार करून शुभेच्छा

Leave a Comment