2024 ला निवडून आलेले शिंदेंचे 57 आमदारही अपात्र ? राज्यात पुन्हा निवडणूक
दैनिक शब्दमत न्युज
नेटवर्क मुंबई
सर्वोच्च न्यायलयामध्ये सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीची पुढची तारीख मंगळवार, 18 ऑगस्टची आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी पाच दिवस युक्तीवाद केला. मंगळवारी त्यांना पुन्हा युक्तिवादासाठी काही वेळ दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असतानाच या खटल्यामध्ये जर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काढून घेण्यात आलं तर 2024 साली विधानसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार अपात्र ठरतील का? हा विषय चर्चेत आहे. याचसंदर्भात ठाकरेंचे विधीविषयक टीममधील वकील असीम सरोदेंनी पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.











