टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल
अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबादप्रतिनिधि मोहम्मद बाईयाश
टेंभुर्णीतील मुख्य हायवे रोडच्या शेजारी असलेल्या दुकानदारांनी बस थांब्यावर केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र या अतिक्रमणाची जबाबदारी घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तयार नाहीत.
या संदर्भात विचारणा केली असता *सा.बा. विभागाचे अभियंता शाम कबरे* यांनी थेट जबाबदारी झटकली. ते म्हणाले, “हा रोड जागतिक बँकेच्या निधीतून करण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी देखील जागतिक बँकेचीच आहे. रोड त्यांनी केला, त्यांनीच अतिक्रमण काढावे.”
प्रशासनाकडून हात झटकणे
हायवे लगतच्या बस थांब्यावर दुकाने, हातगाड्या आणि पत्र्याचे शेड उभारल्याने प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. अपघाताचा धोका वाढला आहे. तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अभियंत्यांनी जबाबदारी जागतिक बँकेवर ढकलल्याने “मग हायवे रोडची देखभाल आणि देखरेख करणार कोण?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शासनाने लक्ष घालण्याची मागणी
स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी मागणी केली आहे की, रस्त्याची निर्मिती कोणीही केली असली तरी त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही शासन आणि स्थानिक प्रशासनाची आहे.
“सर्वचजण जबाबदारी झटकत असतील तर अतिक्रमण कधी काढणार? शासनाने यात तातडीने लक्ष घालून टेंभुर्णी बस थांबा अतिक्रमणमुक्त करावा” अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रशासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी सांगतात हायवे रोड लगतचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारा मध्ये तर सार्वजनिक बांधकाम अधिकारी सांगतायत जागतिक बँकेच्या अधिकारात रोडवरील आपघात वाढत आहे शाळाकरी मुलांना वयवूध्द महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे गाळेधारकांनी व घर मालकांनी भाड्याने दिलेल्या गाळ्याच्या समोर वीस फुट पत्राचे शेड तयार करण्यात आले रोड च्या अगदी पुढे भाडेकरू व्यवसायिकांनी दुकाने थटली यामुळे दुचाकी चार चाकी गाड्या हायवे वरच उभ्या राहिल्या आहेत बस चालकांना व खाजगी वाहन चालवताना मोठी समस्या निर्माण झाली तरी याकडे डोळेझाक होत आहेत मग नेमका हा हायवे रोड कोणाच्या अंतर्गत येतो याकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे











