हिंगोलीच्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेससमोर एखादा अनपेक्षित धक्का बसलेला नाही. उलट, हा धक्का काँग्रेसच्या राजकीय डीएनएमध्ये असलेल्या जुन्याच आजाराचा पुन्हा एकदा झटका आहे.

0
InShot_20251218_223005721
  • हिंगोलीच्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेससमोर एखादा अनपेक्षित धक्का बसलेला नाही. उलट, हा धक्का काँग्रेसच्या राजकीय डीएनएमध्ये असलेल्या जुन्याच आजाराचा पुन्हा एकदा झटका आहे.

 

 

राजकारणात नेतृत्व घडते ते संघर्षातून, चळवळींतून, जनतेच्या संपर्कातून. पण काँग्रेसमध्ये नेतृत्व बहुतेक वेळा ओळखीच्या ओळखीतून ठरते. डॉ. प्रज्ञा सातव यांच्याबाबतही नेमकं तेच घडले. राजीव सातव यांची पत्नी ही ओळख पुरेशी ठरली.

ना संघटनात्मक प्रवास, ना वैचारिक धार,

ना जनाधाराची कसोटी.तरीही काँग्रेसने अनेक वर्षे राबणाऱ्या, पक्षासाठी अपमान गिळणाऱ्या, निवडणुकांत झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून दोन वेळा विधानपरिषदेवर पाठवले. हे केवळ व्यक्तीला मोठे करणे नव्हते, तर कार्यकर्त्यांना लहान करणे होते. यावेळी काँग्रेस नेतृत्वाने विचार केला नाही की

‘उद्या सत्ता बदलेल, तर ही व्यक्ती उभी राहील का?’

कारण ज्यांचे राजकारण पक्षावर नाही, ते कधीच पक्षासाठी थांबत नाहीत.

 

आज डॉ. प्रज्ञा सातव भाजपमध्ये गेल्या. काँग्रेसमध्ये रडारड सुरू आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हा विश्वासघात काँग्रेसनेच स्वतःच्या हाताने घडवून आणला आहे. घराणेशाहीवर उभे केलेले नेतृत्व सत्तेशी निष्ठावंत असते, विचारांशी नाही. म्हणून सत्ता बदलताच विचारही बदलतात, झेंडेही बदलतात. खरा प्रश्न डॉ. प्रज्ञा सातव यांचा नाही. खरा प्रश्न काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेचा आहे. जिथे निष्ठेला किंमत नाही, तिथे निष्ठा टिकत नाही. जर काँग्रेसने आजही आत्मपरीक्षण केले नाही, कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवले नाही, तर आज एक प्रज्ञा गेली आहे, उद्या अशी अनेक नावं जात राहतील. आणि प्रत्येक वेळी काँग्रेस फक्त आश्चर्य व्यक्त करत बसेल. राजकारणात एक साधा नियम आहे ज्यांना संघर्षाची सवय नसते, त्यांना पक्ष सोडण्याची सवय लागते. आणि काँग्रेस आज त्याच नियमाची किंमत भरत असल्याचे दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *