मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

विमानतळ परिसरात झुडपात ड्रोन सापडल्याने खळबळ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

On: April 11, 2026 1:59 AM
Follow Us:
---Advertisement---

विमानतळ परिसरात झुडपात ड्रोन सापडल्याने खळबळ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दैनिक शब्दमत महाराष्ट्राचा बुलंद आवाज

छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात झाडाझुडपांमध्ये एक ड्रोन आढळल्याने गुरुवारी (दि. ९) सकाळी खळबळ उडाली. सकाळी सुमारे ६:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी माहिती दिली की, सीआयएसएफचे पोलिस निरीक्षक धनंजयकुमार सिंग यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. गुरुवारी सकाळी विमानतळ परिसरात सीआयएसएफचे जवान गस्त घालत असताना वॉच टॉवर क्रमांक ७ जवळ झुडपांमध्ये एक ड्रोन पडलेले आढळले.

 

हेड कॉन्स्टेबल संतोष आव्हाड आणि नंदकुमार हे तेथे काम करत असताना त्यांना हा ड्रोन दिसून आला. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ड्रोन जप्त करून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेण्यात आला.

 

प्राथमिक तपासात संबंधित ड्रोन जुना व खराब अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये जीपीएस किंवा व्यावसायिक वापरासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा ड्रोन खेळण्यासाठी वापरला जाणारा (टॉय ड्रोन) असावा आणि परिसरात कुणीतरी उडवताना तो कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, संवेदनशील मानल्या जाणाऱ्या विमानतळ परिसरात ड्रोन सापडल्याने सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

आदिक मासानिमित्त तहसीलदारांचा अंजनाई गोशाळेत गोपूजन व वृक्षारोपण..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यात खळबळ

छावनी क्षेत्र के रावसपुरा में धोखाधड़ी और जालसाजी का बड़ा खुलासा, मामला दर्ज – जमीन हड़पकर बनाया पेट्रोल पंप : फर्जी दस्तावेजों से खड़ा किया धंध दुय्यम निबंधक 2‌ राठोड का आशिर्वाद

टेंडरच्या नावाखाली गोदापात्रात वाळू तस्करांचा धुमाकूळ

२२ नवनिर्वाचित नगरसेवक अडकले चौकशीच्या फेऱ्यात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाची तपासणी सुरू

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका प्रभाग क्र. 9 सवित्रीनगर हिनानगर शाहानगर ब्रिजवाडी नारेगाव मिसरवाडी आरतीनगर मसनतपुर आनंद गाडेनगर पावरलूम चे. संभावित उमेदवार नगरसेवक

Leave a Comment

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia