मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

टेंडरच्या नावाखाली गोदापात्रात वाळू तस्करांचा धुमाकूळ

On: April 4, 2026 1:37 AM
Follow Us:
---Advertisement---

टेंडरच्या नावाखाली गोदापात्रात वाळू तस्करांचा धुमाकूळ

पैठण दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क  -शेख आनिस

पैठण प्रतिनिधी — पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदापात्रात टेंडरच्या नावाखाली वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाने वाळू उपसा व वाहतुकीसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे खुलेआम उल्लंघन होत असून, रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

 

नियमांनुसार वाळू उपसा व वाहतूक करण्यासाठी निश्चित वेळ व अटी घालून दिल्या असतानाही संबंधित ठेकेदारांकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असून, नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

 

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सतत सुरू असलेल्या या अवैध उपशामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच रात्रभर सुरू असलेल्या वाहनांच्या आवाजामुळे ग्रामस्थांच्या शांततेतही व्यत्यय येत आहे.

 

या प्रकाराकडे संबंधित महसूल व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

 

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

सोयगाव : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; सोयगाव पोलिसांची कारवाई, माळेगाव पिंपरी बेकायदा वाळू उपसा

Leave a Comment