मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी; खरिपाच्या पेरण्यांना वेग, शेतकरी सुखावला

On: June 30, 2026 9:35 PM
Follow Us:
---Advertisement---

जाफ्राबाद तालुक्यात वरुणराजाचे जोरदार आगमन; पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

 

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी; खरिपाच्या पेरण्यांना वेग, शेतकरी सुखावला

 दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाफ्राबाद तालुक्याला वरुणराजाने अखेर दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून टेंभुर्णी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अनेक गावांमध्ये बुधवार रात्रीपासून रिपरिप सुरू असून “काया मातीत मातीत… तीफन चालते…!” या ओळींप्रमाणे शेतशिवारात बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. पावसाने हजेरी लावताच टेंभुर्णी व जाफ्राबादच्या बाजारपेठेत बियाणे, खते व औषधांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. ट्रॅक्टर, नांगर व इतर शेती अवजारांच्या दुरुस्तीच्या कामांनाही गती आली आहे. टेंभुर्णी परिसरातील शेतकरी

कृषी विभागाचे आवाहन

 

शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाण्यांवर प्रक्रिया करावी, एकरी बियाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे आणि पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. बनावट बियाणे व खते खरेदी करताना काळजी घ्यावी आणि अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जाफ्राबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे विकास जाधव यांनी केले आहे.

 

बैलजोडी जुंपून तीफन चालवण्याचे काम सुरू होते. “पेरणीयोग्य पाऊस झाला की मातीचा वास येतो. तो वास आला की शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडतो. दोन महिने डोळे लावून बसलो होतो, आता बळीराजा कष्टाला लागला,” अशी भावनिक

 

प्रतिक्रिया अमोल देशमुख यांनी आमच्या वृत प्रतिनिधीशी बोलताना दिली

 

टेंभुर्णीचे शेतकरी संतोष औटी यांनी सांगितले की, नदी-नाले कोरडे पडून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र या पावसाने शेतीला जीवदान मिळाले

 

असून गावातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व यंदा विक्रमी उत्पन्न मिळेल.

 

महिला शेतकरी सुनिता अंभोरे म्हणाल्या की, गेल्या वर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. यंदा वेळेवर पाऊस आल्याने बियाणे आणि खत घेऊन शेतात उतरलो असून मुलाबाळांसाठी दोन घास सुखाचे मिळतील. तर शेतकरी फकिरबा सोनसाळे हे सर्जे राजाला तिफनावरील चाड्यावर मूठ धरून गाणे गात पेरणी करत असल्याचे उत्साहवर्धक चित्र शिवारात पाहायला मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment