मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

भूमाफियांचा मोठा घोटाळाः तोतया महिला उभी करून कोट्यवधींचा प्लॉट हडप बनावट मुखत्यारपत्राद्वारे अवघ्या २० दिवसांत परस्पर विक्री; सिटी चौक पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा

On: July 2, 2026 11:33 AM
Follow Us:
---Advertisement---

भूमाफियांचा मोठा घोटाळा: तोतया महिला उभी करून कोट्यवधींचा प्लॉट हडप

बनावट मुखत्यारपत्राद्वारे अवघ्या २० दिवसांत परस्पर विक्री; सिटी चौक पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा

 

छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर शहरात ‘सर्व्हर डाऊन’चा बहाणा करून ऑफलाईन पद्धतीने बोगस दस्त नोंदणी करण्याच्या प्रकारांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. यावेळी तब्बल ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या जागी तोतया महिला उभी करून बनावट मुखत्यारपत्र तयार करण्यात आले आणि त्याआधारे कोट्यवधी रुपयांचा प्लॉट अवघ्या २० दिवसांत परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व नोंदणी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवालपुरा येथील व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या मालकीचा प्लॉट संस्थेच्या अध्यक्षा मालती खानापूरकर (वय ८०) यांच्या नावावर आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सह दुय्यम निबंधक (क्र. १) कार्यालयात एका अनोळखी महिलेला मालती खानापूरकर असल्याचे भासवून उभे करण्यात आले. या तोतया महिलेच्या नावाने मालेगाव येथील नादिमोद्दीन अलीयुद्दीन शेख याच्या नावे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले.

 

यानंतर अवघ्या २० दिवसांत, म्हणजे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी, नादिमोद्दीनने हा प्लॉट खुलताबाद येथील शेख लतीफोद्दीन इस्माईलोद्दीन आणि अजहर खान गौस खान यांना विकल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच मालती खानापूरकर यांनी संबंधित कार्यालयात तक्रार दाखल केली.

 

या प्रकरणी सह दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून नादिमोद्दीन अलीयुद्दीन शेख, शेख लतीफोद्दीन इस्माईलोद्दीन, अजहर खान गौस खान, सलीम मुर्तुजा शेख, शेख अथर शेख अख्तर, शेख अनीस शेख शफीयोद्दीन आणि एका तोतया महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दीड वर्षांनी गुन्हा दाखल

 

या प्रकरणात मूळ मालकांनी १८ डिसेंबर २०२४ रोजीच तक्रार केली होती. मात्र, प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही अशाच स्वरूपाचे प्रकार समोर आले असून संबंधितांवर वेळेवर कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

‘सर्व्हर डाऊन’चा गैरफायदा

 

शहरात बोगस दस्त नोंदणीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑनलाईन नोंदणीमध्ये बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची असताना ‘सर्व्हर डाऊन’चे कारण पुढे करून ऑफलाईन नोंदणी केली जाते. याच त्रुटीचा फायदा घेत भूमाफिया परगावी राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तांवर डल्ला मारत असल्याचे समोर येत आहे. या प्रकारामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सिटी चौक पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

सोयगाव : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; सोयगाव पोलिसांची कारवाई, माळेगाव पिंपरी बेकायदा वाळू उपसा

Leave a Comment