मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे विभागीय आयुक्त कार्यालया समोर मोठं आंदोलन

On: July 5, 2026 1:58 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे  विभागीय आयुक्त कार्यालया समोर मोठं आंदोलन

 

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले आहे.

 

विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असल्याने परीक्षेची पारदर्शकता, निष्पक्षता, समान संधी आणि आयोगावरील विश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक अडचणी, विविध परीक्षा केंद्रांतील सुविधांमधील असमानता तसेच प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका व चिंता व्यक्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास अधिक दृढ राहावा आणि परीक्षेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी ऑफलाइन (OMR आधारित) परीक्षा पद्धतीच कायम ठेवावी, अशी कळकळीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

या निवेदनावर राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे अभियान सुरू असून, सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील विश्वभूषण मुरलीधर गवर, आशिष कडुभाऊ वानडे, स्वप्नील कैलास काळे आणि कार्तिक सुबाकर राऊत यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

 

महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावना आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या निवेदनाचा सकारात्मक विचार करून ऑफलाइन परीक्षा पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

2024 ला निवडून आलेले शिंदेंचे 57 आमदारही अपात्र ? राज्यात पुन्हा निवडणूक?

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

Leave a Comment