प्रभाकर ( आबा ) काळे यांच्या विजयानिमित्त सोयगावात जल्लोष; सत्कार करून शुभेच्छा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क.
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग
सोयगाव : दि. ५ : दि. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन करत एकहाती सत्ता मिळविली. तसेच सोयगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर ( आबा )काळे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवल्याबद्दल सोयगाव येथे तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. विजयी संचालक प्रभाकर ( आबा )काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, न. प.तील शिवसेना गटनेते अक्षय काळे, किशोर मापारी, हर्षल काळे, गजानन कुडके, दिपक पगारे, संदीप सुरडकर, लतिफ शहा, मोतीराम पंडीत, कदीर शहा, रमेश गव्हांडे, नारायण घनघाव, जिवन पाटील, फिरोज पठाण, हर्षल देशमुख, योगेश पाटील, संदीप चौधरी, सुनिल निकम, रविंद्र काळे, विलास बोर्डे, विजय काळे, भगवान वाघ, अमोल मापारी, रमेश वामने, अमोल निकम, समाधान काळे, सलमान पठाण, साई पाटील, गजानन ढगे, आबा कोळी, निवृत्ती गव्हांडे, रंगनाथ पाटील, कृष्णा जुनघरे, धनराज औरंगे, स्वप्नील काळे, प्रकाश देसाई, विष्णू इंगळे, अरुण सोहनी, दिगंबर वाघ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











